ध्वनीसंयोजक हा एक प्रकारे स्टोरीटेलरच असतो. वेगवेगळ्या आवाजांच्या माध्यमातून तो गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो.
चित्रपटाचे ध्वनिसंयोजन म्हणजेच साऊंडवर काम करताना अनेक गोष्टी कल्पकतेने केल्या जातात. मात्र चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ध्वनिसंयोजनाकडे आपले म्हणावे तितके लक्ष जात नाही. ‘पुष्पक विमान’ या चित्रपटाच्या ध्वनिसंयोजनासाठी उत्कृष्ट ध्वनिसंयोजक म्हणून राज्य पुरस्कार मिळालेल्या मंदार कमलापूरकर या मराठमोळ्या तरुणाशी मारलेल्या गप्पांमधून हा विषय उलगडत जातो.......